For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर वसुलीवर अधिकाधिक भर द्या

11:07 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर वसुलीवर अधिकाधिक भर द्या
Advertisement

महानगरपालिका आयुक्त लोकेश यांची बैठकीत सूचना

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारने कर वसुलीमध्ये जनतेला 5 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे त्याची जनजागृती करून जास्तीत जास्त कर वसुली करा, अशी सूचना मनपा आयुक्त पी. एन. लोकेश आणि महसूल उपायुक्त गुरुनाथ दड्डे यांनी महसूल निरीक्षकांना केली आहे. मंगळवारी महसूल निरीक्षकांची महानगरपालिकेमध्ये बैठक घेण्यात आली. त्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांना कर जमा करण्याबाबत सांगण्यात आले. प्रत्येकाच्या घरोघरी जावून कर वसुली करा. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी कर भरला नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचला, असेही सांगण्यात आले. काही महसूल निरीक्षकांनी कर वसुलीकडे गांभीर्याने लक्षच दिले नाही, त्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी आपल्या प्रभागांमध्ये जावून अधिकाधिक घरपट्टी जमा करा. जुलै 31 पर्यंत पाच टक्के सवलत दिली आहे. त्याचा लाभ जनतेला देण्यासाठी आता अधिकाऱ्यांनीच जनजागृतीसह कर वसुलीवर भर देणे गरजेचे आहे. यावेळी शहरातील निरीक्षकांनी केलेल्या कर वसुलीसह इतर कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.कर वसुली करताना ऑनलाईन बरोबरच चलनद्वारेही जनता कर भरत असेल तर त्यांना मार्गदर्शन करा. कोणतीही अडचण आली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करा. मात्र अधिकाधिक कर वसुली करा, असे या बैठकीत सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.