For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकांच्या नजीक मुलांना सीट द्या!

06:11 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पालकांच्या नजीक मुलांना सीट द्या
Advertisement

डीजीसीएचा विमानोड्डाण कंपन्यांना निर्देश : मुलांच्या सुरक्षेचा विचार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हवाईप्रवासादरम्यान त्यांच्या आईवडिलांनजीकची सीट मिळणार आहे. नागरी उ•ाण महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व एअरलाइन्सना याकरता दिशानिर्देश दिले आहेत. डीजीसीएने मंगळवारी यासंबंधी परिपत्रक जारी करत सर्व एअरलाइन्सना हा नियम अनिवार्य स्वरुपात लागू करण्यास सांगितले आहे.

Advertisement

डीजीसीएकडून हा निर्णय हवाईप्रवासादरम्यान मुलांच्या सुरक्षेचा विचार करून घेण्यात आला आहे. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांचे आईवडील/पालकांपैकी किमान एकासोबतची सीट दिली जावी, एकाच पीएनआरवर प्रवास करत असलेल्या कुटुंबांकरता ही सुविधा देण्यात यावी. तसेच याची पूर्ण नोंद ठेवण्यात यावी, असे डीजीसीएने स्वत:च्या परिपत्रकात नमूद केले आहे.

अतिरिक्त शुल्क नाही

एका मुलाला त्याच्या आईवडिलांसोबत बसण्यापासून रोखण्यात आल्याची तक्रार मिळाल्यावर डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. आता डीजीसीएकडून जारी 2024 चे एअर ट्रान्सपोर्ट सर्क्युलर-01 नुसार 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांच्या पालकांनजीकचे आसन उपलब्ध होणार आहे. तसेच याकरता प्रवाशांना कुठलेच अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. डीजीसीएनुसार एअरलाइन्स मुलांच्या सीटसाठी पालकांवर दबाव टाकू शकत नाहीत. परंतु पालकाने स्वत:साठी फ्री सीट किंवा ऑटो अॅलोकेशनचा पर्याय निवडला असेल तर नजीकची सीट मुलासाठी उपलब्ध करावी लागणार आहे.

या सुविधांकरिता शुल्क

मुलांना स्वत:च्या आईवडिलांनजीकची सीट उपलब्ध करण्याच्या आदेशासोबत डीजीसीएने एअरलाइन्सना झिरो बॅगेज, पसंतीची सीट शेअरिंग, मील, ड्रिंक आणि संगीत वाद्ययंत्र नेण्याची अनुमती दिली आहे. या सुविधा ऑप्ट इन म्हणजेच अनिवार्य नाहीत, यात ऑटो सीटची सुविधा देखील सामील करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.