कोकणातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्या
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे तिमिरातुनी तेजाकडे” संस्थेची मागणी
ओटवणे | प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या शैक्षणिक, रोजगार, शिष्यवृती, सामाजिक कल्याणविषयक विविध योजनांचा प्रसार करून त्याचा लाभ कोकणातील विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा अशी मागणी 'तिमिरातुनी तेजाकडे” या नोंदणीकृत संस्थेच्यावतीने केंद्रीय पर्यावरण, वन तसेच जलवायु परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे करण्यात आली.मंत्री भूपेंद्र यादव मुंबई मेघदूत बंगल्यावर चर्चासत्रासाठी आले असता 'तिमिरातुनी तेजाकडे' या संस्थेचे अध्यक्ष सचिन रेडकर व समविचारी व्यक्ति आणि मुंबई मुंबई भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष नरेंद्र गावकर, पत्रकार
भालचंद्र होलम यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबत मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करून याबाबतचे सविस्तर निवेदन देण्यात आले.
तिमिरातुनी तेजाकडे ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील शैक्षणिक व रोजगारविषयक प्रश्नांवर विविध माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे. या संस्थेमार्फत विविध ठिकाणी निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. आतापर्यंत 296 निशुल्क मार्गदर्शन कार्यशाळा झाल्या असून या माध्यमातून बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. जवळपास २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. सिंधुपुत्र व मुंबई सीमाशुल्क मध्ये कार्यरत अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर हे या संस्थेच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक असून कोकणातील विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करत आहेत. कोकणातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत आणण्यासाठी आणि कोकण शैक्षणिक दृष्टिकोणातून बोर्डाप्रमाणेच करियर मध्ये शासकीय सेवेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी अविरतपणे आपले ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यामूळे यापुढेही कोकणातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक विषयांवर व अन्य विषयांसाठी शासनस्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तिमिरातुनी तेजाकडे या संस्थेचे अध्यक्ष सचिन यशवंत रेडकर यांनी केले आहे.