For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेची सेवा करण्याची संधी द्या

10:55 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनतेची सेवा करण्याची संधी द्या
Advertisement

प्रियांका जारकीहोळी : हुक्केरी विधानसभा मतदारसंघात प्रचार

Advertisement

बेळगाव : गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेचे काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत बहुमत मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी येत्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवित आहे. मला भरघोस मतदान करून विजयी करावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील बेनकनहोळ्ळी, केरी मास्तीहोळी, नरसिंगपूर, मजती, माणगाव आदी गावांमध्ये प्रचार करून आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून अनेक विकासकामे राबविली जात आहेत. आपल्या मतदारसंघात प्रत्येक गावाला रस्ते, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत नागरिकांच्या मागणीनुसार मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शाळा-महाविद्यालये निर्माण करून देण्यात आली आहेत. भविष्यातही ही विकासकामे अशीच सुरू राहणार आहेत. मतदारांनी काँग्रेसला मत देऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन प्रियांका जारकीहोळी यांनी केले. शिक्षणासह क्रीडापटूंनाही सतीश जारकीहोळी फाऊंडेशनकडून मदत केली जात आहे. होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या शिक्षणासाठी मदत केली जात आहे. राज्यातील काँग्रेस सरकारकडून पाच गॅरंटी योजना जाहीर केल्या होत्या. त्यांची समर्पकपणे अंमलबजावणी केली जात आहे. गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. मोफत वीजपुरवठा करून दिला जात आहे. शक्ती योजनेतून मोफत बसप्रवास महिलांसाठी देण्यात आला आहे. अशा प्रकारे गोरगरिबांना काँग्रेस सरकारकडून योजना राबविल्या जात आहेत. याची दखल घेऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेसला विजयी करा, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.