For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!

04:45 PM Apr 23, 2024 IST | अनुजा कुडतरकर
रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

विनायक राऊतांचे सुपुत्र गितेश राऊत, शैलेश परब यांचे निलेश राणेंना आव्हान

माजी खासदार निलेश राणे यांनी रेडी पोर्ट आणि मायनिंग कडुन हप्ता वसुली करतो असे आमच्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत . आम्ही हप्ता वसुली करत असल्याचे पुरावे निलेश राणे यांनी जनतेसमोर कधीही उघड करावे असे आव्हान खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत, भाचे शैलेश परब यांनी निलेश राणे यांना दिले आहे. नारायण राणे इन्कम टॅक्स मध्ये साधे क्लार्क होते. परंतु आता त्यांची संपत्ती दीडशे कोटी झाली आहे. ही संपत्ती त्यांनी कुठून आणली याचा हिशोब जनतेला द्यावा असे आव्हानही राऊत,  परब यांनी निलेश राणे यांना दिले. सिंधुदुर्गची प्रगती झाली नाही मात्र ,राणे कुटुंबीयांची प्रगती झाली असा टोलाही त्यांनी  यावेळी हाणला.

Advertisement

निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत , भाचे शैलेश परब, हिमांशू परब यांच्यावर ते रेडी पोर्ट आणि मायनिंग कडून हप्ता वसुली करत आहेत असा आरोप करीत काही छायाचित्र त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सादर केली होती .तसेच यासंदर्भात ऑडिओ क्लिप जाहीर करणार असल्याचे सांगितले होते .या पार्श्वभूमीवर गीतेश राऊत, शैलेश परब यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली आणि निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिले.

Advertisement
Tags :

.