कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अन्नोत्सव फॅशन शोमध्ये जीआयटीला विजेतेपद

11:14 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : चटपटीत आणि खमंग खाद्यपदार्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोटरी अन्नोत्सवमध्ये खाद्यपदार्थांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. अन्नोत्सवनिमित्त घेण्यात आलेल्या फॅशन शो स्पर्धेमध्ये केएलएस जीआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकाविले. दुसरे टीम प्राईड व तिसरे पारितोषिक एलिटने पटकाविले आहे. फॅशन डिझाईनर तज्ञ नवनीत पाटील, श्रीकांत शेट्टर, सोनाली मांडके यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. अन्नोत्सवमध्ये केवळ बेळगावचीच नाही तर देशभरातील खाद्यसंस्कृती पाहायला मिळत आहे.

Advertisement

प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले नागरिक राहुल बिर्याणी व स्पाईस दे गोवा या स्टॉलवर गर्दी करत आहेत. गोव्याची खाद्यसंस्कृती असलेल्या चिकन कॅफ्रल, गोवन पाव व चोणक रवा फ्राय या मासळीच्या डिशवर ताव मारताना दिसून येत आहेत. शाकाहारी खाद्यप्रेमींसाठी कोल्हापूर थालीपीठ आकर्षूण घेत आहे. झणझणीत कोल्हापुरी झटका या थालीपीठाला असल्याने खवय्यांची गर्दी होत आहे.  त्याचबरोबर मॅग्नेटा आइस्क्रीमची चव चाखली जात आहे. महिलांसाठी मिस बेळगाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती. महिलांनी आपल्यातील सुप्त कलागुण यावेळी सादर केले. अन्नोत्सवमध्ये सहभागी नागरिकांनी मिस बेळगाव स्पर्धेला प्रतिसाद दिला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article