For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीआयटी सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी डिझाइन अॅण्ड इनोव्हेशनचे आज उद्घाटन

10:50 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जीआयटी सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी डिझाइन अॅण्ड इनोव्हेशनचे आज उद्घाटन
Advertisement

बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटीची स्थापना 1939 मध्ये झाली. पुणे आणि मुंबई येथे पहिले लॉ कॉलेज सुरू झाले. यानंतर 1954 मध्ये गोगटे कॉलेजात कॉमर्सची सुरुवात झाली. 1979 मध्ये पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी डिझाइन अॅण्ड इनोव्हेशनचे उद्घाटन शनिवार दि. 13 रोजी सकाळी 10.30 वाजता जीआयटीच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती जीआयटीचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जीआयटी ही 2015 पासून स्वायत्त संस्था म्हणून व्हीटीयूशी सलग्न आहे. या संस्थेला नॅककडून ‘ए प्लस’ मान्यता मिळाली आहे.

Advertisement

याबरोबर विविध पदवी आणि पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याबरोबर मेकॅनिकल आणि सिव्हिलसारख्या शाखांमध्ये 120 हून अधिक विद्यार्थी प्रवेश घेऊन दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांना जीआयटी कॉलेजमध्ये सर्वगुण संपन्न शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर पॅकेजीस मिळत आहेत, अशी माहितीही जीआयटीचे प्राचार्य एम. एस. पाटील यांनी दिली. यावेळी जीआयटी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे एचओडी एच. बी. कुलकर्णी यांनी मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश वाढू लागले आहेत. नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा कल इंजिनिअरिंगकडे वाढत असल्याचे सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.