मुलींच्या मिनी ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचा गौरव
बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक ऑलिम्पिक संघटना व युथ सक्षमीकरण सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षांखालील तिसऱ्या मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने कारवार जिल्हा संघाचा 4-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविलेल्या बेळगाव जिल्हा संघाचा पोलीस आयुक्तांकडून खास गौरव करण्यात आला. पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत बेळगावने एकही सामना न हरता आपली विजयी घौडदौड कायम राखली. या संघात वैभवी सायनेकर, तेजल हंसी, मारिया मुजावर, मयुरी तिम्मापूर, मालिका बाडीवाले, जानवी चव्हाण, प्रांजल हजरी, अवनी सानिकोप्प, वैष्णवी होसमनी, तनिष्का सप्रे, इफा अत्तार, रोहिणी कांबळे, इफा बडेभाई, सायल कुडतरकर, क्लेस्ट्रा मधुराई, वैष्णवी संकपाळ, इंद्रायणी पावनोजी, श्रद्धा पाटील आदी खेळाडूंचा समावेश असून संघाचे व्यवस्थापक म्हणून मानस नाईक तर प्रशिक्षक म्हणून हेमांशी गौर यांनी या संघाला योग्य मार्गदर्शन केले. या खेळाडूंचा पोलीस आयुक्त येडा मार्टीन मार्बन्यांग, मधुकर सामंत, आनंद सराफ, ज्ञानेश कलघटगी, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, प्राचार्य एस. एन. देसाई, रामकृष्ण एन., प्रशांत मनकाळे, आनंद रत्नापगोळ, विनय नाईक, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, सचीव अमित पाटील, जॉर्ज राँड्रीग्ज, प्रशांत देवदानम, रवी चौगुले, एस. एस. नरगोडी, अनिकेत पतकी आदी मान्यवरांच्या हस्ते या विजेत्या संघाचा खास गौरव करण्यात आला. व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.