For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीबीएसई निकालात मुलींचाच करिष्मा

06:02 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीबीएसई निकालात मुलींचाच करिष्मा
Advertisement

बारावीत 87.98, तर दहावीत 93.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी बारावी आणि दहावी या दोन्ही इयत्तांचा निकाल जाहीर केला. बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर तासाभरात दहावीचा निकालही जारी करण्यात आला. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून बारावीत 87.98 तर दहावीत 93.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी आणि पालक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल तपासू शकतात. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही दोन्ही इयत्तांमधील टॉपर्स किंवा गुणवत्ता यादी बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

Advertisement

यावषी 22,38,827 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 20,95,467 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.60 टक्के इतकी राहिली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.48 टक्क्मयांनी वाढले आहे. 2023 मध्ये ते 92.12 टक्के होते. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 94.75 असून मुलांचे प्रमाण 92.71 टक्के आहे.

यंदा बारावीमध्ये 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावषीच्या तुलनेत उत्तीर्णतेची टक्केवारी 0.65 टक्क्यांनी वाढली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 6.40 टक्क्यांनी जास्त आहे. यावेळी 91 टक्क्मयांहून अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वोत्तम

बारावीच्या निकालांमध्ये त्रिवेंद्रम विभागाने पुन्हा एकदा 99.91 टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर प्रयागराजचा निकाल 78.25 टक्क्यांसह सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. दहावीमध्येही त्रिवेंद्रम विभागाने 99.75 टक्के निकालासह सर्वोच्च स्थान पटकावले. तर विजयवाडा विभाग 99.60 टक्के उत्तीर्णतेसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई विभाग 99.30 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुवाहाटी विभागात केवळ 77.94 टक्के निकाल लागला.

1,16,145 विद्यार्थी नव्वदीपार

बारावीच्या अंतिम परीक्षेत 24,068 विद्यार्थ्यांना 95 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले. हे प्रमाण उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 1.48 टक्के आहे. तर, 1,16,145 विद्यार्थ्यांनी 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी हे प्रमाण 7.16 टक्के आहे.

गुणवत्ता यादी, टॉपरची घोषणा नाही

गेल्यावषी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर झाली नव्हती. विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही स्पर्धा होऊ नये यासाठी बोर्डाने गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे यंदाही बोर्डाच्या परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याने कोणत्याही टॉपरचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Advertisement
Tags :

.