For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | सोलापुरातून रोजच होताहेत मुली अन् महिला गायब

02:10 PM Jun 13, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur crime   सोलापुरातून रोजच होताहेत मुली अन् महिला गायब
Advertisement

शहरातून २०२५ मध्ये १०६ तर चालू वर्षात ३६ अल्पवयीन मुलींचे अपहरण

Advertisement

सोलापूर : सोलापुरातून दररोज मुली व महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. समाजामध्ये कुटुंबाची इज्जत जाऊ नये, यासाठी पोलिसांकडे नोंद होणाऱ्या आकडेवारीपेक्षा नोंद न होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोलापूर शहरातून २०२५ मध्ये १०६ तर चालू वर्षात ३६ अल्पवयीन मुलींचे अपहरण झालेले आहे. त्यापैकी सात मुली अद्याप बेपत्ता आहेत.

तरुण मुली आणि विवाहित महिला 'सैराट' होत आहेत. समाज आणि कुटुंब यांची बंधने झुगारून देत मुली आणि महिला मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यात हा प्रकार दररोज घडतोय. सोलापुरातील सात पोलीस ठाण्यांबरोबरच जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांमध्ये बेपत्ता होण्यासंदर्भातील मिसींगचे गुन्हे दाखल होताहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हे चित्र भयावह आहे.

Advertisement

बेपत्ता होण्यांचे वाढते प्रमाण हा संबंधित कुटुंबीयांसह समाजाच्या चिंतनाचा विषय बनला आहे. तारुण्यातील मुली आणि महिला बेपत्ता होण्यावर कायमस्वरुपी काय तोडगा निघणार का हा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. समाजात, भावकीत, गावात आणि नातेवाईकांमध्ये अब्रुचं खोबरं होईल, म्हणून बहुतांश प्रकरणांमध्ये पोलिसांत तक्रार देण्याचं टाळलाय जातंय.

मात्र मुली आणि महिला बेपत्ता होण्यातून तोंड दाबून बुक्यांचा मार मात्र संबंधित कुटुंबीयांना सहन करावा लागतोय एवढे मात्र खरे आहे.

बेपत्ता होण्याची पुढे आलेली 'ही' कारणे

कुटुंबातील तणाव आणि संवादाचा अभाव : मुलींवर असलेले कठोर निबंध, कौटुंबिक तणाव, पालकांशी संवादाचा अभाव यामुळे त्या पर सोडण्याचा विचार करतात.
प्रेम आणि स्वातंत्र्याची ओढ : युवक-युवतींच्या प्रेमसंबंधांकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनामुळे अनेकजण नाईलाजाने घराबाहेर पडतात.
शारीरिक आणि मानसिक हिंसाचार : अनेक महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो. परिस्थिती सहज करण्याऐवजी त्या पलायनाचा मार्ग स्वीकारतात.
सोशल मीडिया आणि इंटरनेटचा प्रभाव : ऑनलाईन माध्यमांवरून मिळणारी माहिती आणि मित्रमंडळींचा प्रभावही मोठ्या प्रमाणावर निर्णय घेताना दिसतो. सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलं आहे. सोशल मीडियाच्या साईट्वरुन मैत्री होतेय अन् त्यातून एकमेकांसोबत राहण्याच्या पार्श्वभूमीवर, तरुणी आणि महिला गायब होतात.

पोलीस नोंदी आणि अदृश्य तक्रारी....
सोलापूर पोलिसांच्या अधिकृत नोंदींनुसार, अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत आहे. मात्र, सामाजिक लज्जेपोटी अनेक कुटुंबे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे टाळतात. त्यामुळे प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा परिस्थिती आणखी गंभीर आहे. मुली आणि महिला घरच्यांना काहीही न सांगता निघून जात आहेत. हा आकडा चिंताजनक असून, वा समस्येचा खोलवर विचार करण्याची वेळ आली आहे.

समस्या कोणाची आणि जबाबदारी कोणावर...
तरुणी आणि महिला बेपत्ता होणाच्या या घटनांसाठी केवळ कुटुंब, समाज किंवा यंत्रणा यांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. बदलत्या सामाजिक प्रवाहात, मानसिक आरोग्य, कौटुंबिक संवाद, युवक-युवतींच्या स्वातंत्र्याची व्याख्या आणि शिक्षणाची भूमिका वावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

मुली आणि महिला बेपत्ता होणं ही केवळ सोलापूर या एक शहराची नाही, तर संपूर्ण समाजाची समस्या आहे. हा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करण्यापूर्वी, आपल्या जबाबदाऱ्या ओळखून योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. बेपत्ता होण्याचे प्रकार वाढत गेल्यासह कुंटुंबासह समाजाचे अधःपतन होणार आहे. कुटुंबासह सामाजिक चिंतनाचा हा विषय व्यक्तीगतसह सामाजिक स्तरावर उपाययोजनांसाठी गांभीर्य पूर्वक घ्यायला हवा.

सोलापूर शहरात गेल्या काही वर्षांत तरुण मुली आणि विवाहित महिलांच्या घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रेमप्रकरण, कौटुंबिक कलह, घरगुती हिंसाचार, स्वातंत्र्याच्या शोधात घेतलेले धाडसी निर्णय यांसारखी अनेक कारणे या पटनांच्या मुळाशी असू शकतात. मात्र, हा विषय केवल व्यक्तिगत पातळीवर मर्यादित न ठेवता त्यामागील सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याची गरज आहे.

विवाहितांबरोबरच मुलींवर बंधणे आवश्यक कुंटुंबातील महिला किंवा युवती कोणाच्या संपर्कात आहेत, मोबाईवर त्यांचे कोणाशी चॅटिंग सुरु आहे. त्या परातून कशासाठी आणि कितीवेळ बाहेर पडताहेत? का पडतात? या सगळ्या सगळ्या बाबींवर घरातील थोरामोठ्यांचे बारीक लक्ष असावला हवे. त्यांच्यावर बंधण असणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.