भाडेतत्वावर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा फील
व्हॅलेंटाइन डेवर चालते सर्व्हिस, भारतातही उपलब्ध
एकेकाळी लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ करावी लागत होती. परंतु सद्यकाळात घरात कुठलीही गोष्ट हवी असेल तर अॅपद्वारे मागविण्याची सोय आहे. तसेच नातेही हवे असेल तर अॅपद्वारे मिळविता येते. तुम्हाला बॉयफ्रेंड-गर्लंप्रेडही मिळतील आणि ते देखील कुठल्याही कमिटमेंट शिवाय.
जगात आता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड देखील भाडेतत्वावर मिळत आहेत. एका दिवसाचा प्रेमाचा देखावा आणि मग पैसे घेऊन आपाआपली वाट पकडण्याचा हा प्रकार आहे. शेजारी देश चीनसोबत जपान आणि व्हिएतनाम यासारख्या देशांमध्येही सेवा मिळत आहे.
चीनमध्ये दर 2018 पासूनच लोकांना शो ऑफसाठी गर्लप्रेंड हायर करण्याची सेवा मिळत आहे. त्यावेळी 20 मिनिटांसाठी सेवेसाठी 100 रुपयांचे शुल्क आकारले जात होते आणि शॉपिंग मॉलमध्ये ही सेवा पुरविली जात होती. यात समोरच्या व्यक्तीला स्पर्श करण्याची तसेच बाहेर नेण्याची अनुमती नव्हती.
आता ऑनलाइन युग सुरू झाल्याने गर्लप्रेंडची सर्व्हिस देखील अॅप आणि इन्स्टाग्रामद्वारे मिळत आहे. चीन आणि जपानमध्ये सहजपणे अॅपद्वारे गर्लफ्रेंड भाडेतत्वावर मिळते. या गर्लफ्रेंडसोबत खाणेपिणे, फिरणे अन् हिंडता येणार आहे. अशाचप्रकारे बॉयफ्रेंड देखील मिळतो.
भारतात देखील एक अॅप असून त्याद्वारे भाडेतत्वावर बॉयफ्रेंड मिळतो. याकरता रितसर हायरिंग देखील काढण्यात आली होती, ज्यात चांगले दिसणाऱ्या युवकांकडून सीव्ही मागविण्यात आला होता. रेंट अ बॉयप्रेंड हा अॅप मुंबईतून सुरु झाला होता. 2022 मध्ये बेंगळूरमध्ये अशाच प्रकारे दोन आणखी अॅप सुरू झाले आणि नंतर काही मोठ्या शहरांमध्ये अशाप्रकारची सर्व्हिस सुरू झाली.