For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

ब्लॅकमेलिंगला वैतागून युवतीची आत्महत्या

10:04 AM Oct 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
ब्लॅकमेलिंगला वैतागून युवतीची आत्महत्या

भटकळ तालुक्यातील हडवळ्ळी येथील घटना

Advertisement

कारवार : इन्स्टाग्रामवरील मित्राच्या ब्लॅकमेलिंगला वैतागून युवतीने आत्महत्या केल्याची घटना भटकळ तालुक्यातील हडवळ्ळी येथे घडली आहे. नेत्रा गोवाळी (वय 24) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तर ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तिच्या इन्स्टाग्राम मित्राचे नाव गोवर्धन मोगेर असे आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, नेत्राची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी गोवर्धन याच्याशी ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले होते. तथापि अलिकडच्या काळात गोवर्धनने नेत्रा हिच्यावर केलेल्या खर्चाची मागणी केली. खर्चाची रक्कम परत करण्यात आली नाही तर नेत्राचे अश्लिल व्हिडिओ सोशल मेडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगला वैतागून नेत्राने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. नेत्राच्या वडिलांनी गोवर्धनच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. भटकळ ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.