For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गिरीश चोडणकर यांची तीन तास चौकशी

01:13 PM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
गिरीश चोडणकर यांची तीन तास चौकशी
Advertisement

म्हापसा : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मांडवी नदीतील कॅसिनोमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार म्हापसा येथील सिद्धार्थ मांद्रेकर यांनी म्हापसा पोलिसस्थानकात दिली होती. त्या तक्रारीला अनुसरून रविवारी दुपारी म्हापसा पोलिसांनी गिरीश चोडणकर यांना बोलावून त्यांची तीन तास चौकशी केली. त्यांना सुमारे 150 प्रश्न विचारण्य़ात आले. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरीत असून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी आणि आपला आवाज दडपण्यासाठी ही कारवाई केली, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

Advertisement

यावेळी म्हापसा पोलिस निरीक्षक नविन देसाई यांच्या कार्यालयात अधीक्षक सलीम शेख, उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक निनाद देऊलकर उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे गोवा प्रदेश युवा अध्यक्ष अर्चित नाईक, सरचिटणीस नौशाद चौधरी, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस प्रदीप नाईक उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले की, मांडवी नदीतील कॅसिनोमुळे होणारे प्रदूषण हा मुख्य मुद्दा असून जनतेपर्यंत वस्तूस्थिती पोचविण्यासाठीच संबंधित व्हिडिओ तयार करण्यात आला होता. पोलिसांनी चौकशीसाठी बोलविल्याबद्दल तक्रारदाराचे आभार मानून आपण सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण कुठल्याही धर्माचा अवमान केला नाही

Advertisement

आपण कुठेही गंगा आरती वा कोणत्याही धर्माचा वापर केला नाही. आपण हिंदू आहे. म्हादई नदीला पणजीत मांडवी म्हटले जाते ती आमची आई असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते. मात्र कॅसिनोमुळे तीचे प्रदूषण होत आहे हाच मुद्दा मांडण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केल्याचे चोडणकर यांनी सांगितले. पोलिस बळाचा वापर करून आपली बाजू न ऐकताच आपल्या विरोधात एफ्ढआयआर नेंदविल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले. एफआयआर करण्यासारखे यात काहीच नाही. आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले असून पुन्हा ते आपल्यास याबाबत बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चोडणकर यांची सखोल चौकशी केली

स्वराज गोमंतक म्हापशाचे अध्यक्ष सिद्धार्थ मांद्रेकर यांनी म्हापसा पोलिसस्थानकात तक्रार दिली होती की, गिरीश चोडणकर यांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आरतीचा त्यांनी व्हिडिओ पोष्ट केला होता. त्यात कॅसिनो व मांडवीवर होता. हा पोष्ट एआयद्वारे केला होता. यावर आमची तपासणी सुरू होती. त्यात पोष्ट करणारा मुख्य संशयित गिरीश चोडणकर होता. त्याद्वारे चौकशीसाठी त्यांना म्हापसा पोलिसस्थानकात बोलावले व संपूर्ण चौकशी केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक सलीम शेख यांनी दिली.

-अधीक्षक सलीम शेख

Advertisement
Tags :

.