गिरीश चोडणकर गुजरात निरीक्षकपदी
02:43 PM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची गुजरातचे निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. संघटन सृजन अभियान अंतर्गत पक्षातर्फे निवड झाली आहे. ते कॉग्रेस कार्यकारी समितीचेही सदस्य असून त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्षाला गुजरातमध्ये होईल. या अपेक्षेने ही निवड करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. सदर निवडीची कार्यवाही तातडीने करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement