महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गिरिराज सिंहांची यात्रा, भाजप-संजदमध्ये मतभेद

06:44 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घटनेचे पालन करण्याचा संजद नेत्याचा सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

बिहारमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणूक होणार असून राज्यात आतापासूनच राजकीय यात्रांना प्रारंभ झाला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते गिरिराज सिंह यांच्या हिंदू स्वाभिमान यात्रेवरून राजकीय वाक्युद्ध सुरू आहे. या यात्रेच्या विरोधात रालोआचा घटक पक्ष संजदने आक्रमक भूमिका दर्शविली ओ. संजद नेते नीरज कुमार यांनी जात-धर्माचा दाखला देत गिरिराज यांना घटनेच्या शपथेची आठवण करून दिली. देशात धर्म, जातीच्या वर जात काम करावे असे  राज्यघटना सांगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गिरिराज यांची हिंदू स्वाभिमान यात्रा बिहारमध्ये 18 ऑक्टोबरपासून 22 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. ही यात्रा प्रामुख्याने मुस्लीमबहुल सीमांचल भागातून निघणार आहे. याचा प्रारंभ भागलपूर येथून होणार असून किशनगंजमध्ये याचा समारोप होईल. गिरिराज 18 ऑक्टोबर रोजी भागलपूर, 19 ऑक्टोबर रोजी कटिहार, 20 ऑक्टोबर रोजी पूर्णिया, 21 ऑक्टोबर रोजी अररिया आणि 22 ऑक्टोबर रोजी किशनगंज येथे पोहोचणार ओत. यात भागलपूर वगळल्यास सर्व ठिकाणं ही सीमांचलातील असून तेथे मोठ्या संख्येत मुस्लीम लोकसंख्या आहे.

गिरिराज यांच्या या यात्रेमुळे संजद नाराज असल्याचे चित्र आहे. नितीश कुमार हे जागतिक नेते आणि  पर्यावरणाबद्दल विचार करणारे आहेत. त्यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याची रणनीति आखल्यावर मोठ्या संख्येत त्यांचे फॉलोअर्स वाढले आहेत. देशात राज्यघटना लागू असून जात-धर्माच्या वर जात काम करण्याची शपथ ही राज्यघटना  देत. हीच शपथ घेऊन संसदीय जीवनात काम केले जाते. एका हातात हूं स्वाभिमान यात्रा घ्या आणि दुसऱ्या हातात राज्यघटनेच्या शपथेचे   कागदपत्र ठेवा. हे ऐकण्यास चांगले वाटेल आणि लोकांना पाहण्यास देखील चांगले वाटेल असे संजद नेते नीरज कुमार यांनी म्हटले आहे.

नितीश यांच्याकडून सीमांचलचा विकास

नितीश कुमार हे हिंदू मंदिरांचा स्वाभिमान वाढवितात. भागलपूरमध्ये बूढानाथ मंदिर असून तेथे नितीश यांनी अत्यंत मोठे पार्क निर्माण केले आहे. मनोकामना मंदिराचा विकास घडवून आणला. कांवड यात्रेसाठी सुल्तानगंजपासून देवघरपर्यंत सुविधा निर्माण केल्या आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने कृषी महाविद्यालय सुरू केले आहे. तेथे सनातनचे लोकही शिक्षण घेत आहेत. कुठल्याही प्रकारची समस्या कुणालाच नाही. आम्ही दफनभूमी निर्माण केल्या तसेच स्मशानभूमीला सुविधाही पुरविल्या आहेत. सीमांचलच्या भागात नितीश कुमार यांनी विकास घडवून आणला आहे. सामाजिक सौहार्द हेच आमचे भांडवल असून ते आम्ही कायम राखणार आहोत असा दावा नीरज कुमार यांनी केला.

जनतेचे लक्ष विचलित करू नका

बिहार आणि देशाच्या विकासावर गिरिराज यांनी बोलावे. जनता केवळ विकासाबद्दल ऐकू इच्छित आहे. जनतेचे लक्ष विचलित करू नका असे उद्गार संजद नेते विजय चौधरी यांनी यात्रेसंबंधी काढले होते. तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे बुधवारपासून बिहारमध्ये स्वत:च्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article