For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गिन्न्नी वेड्स सनी 2’चा ट्रेलर सादर

06:17 AM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गिन्न्नी वेड्स सनी 2’चा ट्रेलर सादर
Advertisement

अविनाश तिवारी अन् मेधा शंकर मुख्य भूमिकेत

Advertisement

यंदाच्या वर्षातील आणखी एक मनोरंजक चित्रपट ‘गिन्नी वेड्स सनी 2’चा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला आहे. हा एक कौटुंबिक नाट्या दर्शविणारा चित्रपट असून तो रोमांस, उलथापालथ आणि हास्याने युक्त आहे. एक प्रेमकहाणीची झलक सादर करत ट्रेलर गुंतागुंत, रुसवेफुगवे आणि अनेक ट्विस्टने युक्त प्रवास आहे. यात अविनाश तिवारी आणि मेधा शंकर मुख्य भूमिकेत आहेत.

अनिवाश आणि मेधाचा हा चित्रपट एक नवी केमिस्ट्री सादर करतो, कारण दोघांच्या भूमिका अशा नात्याला निभावत आहेत, ज्या उलथापालथीने भरलेल्या आहेत. मजेशीर रुसवेफुगवे आणि अनोख्या स्थितीपासून एनर्जीने भरपूर कौटुंबिक नाट्यापयर्तं ट्रेलर अत्यंत दोन वेगळ्या जगतांच्या मिलनाला दाखवितो, जे प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक फिल्मी अनुभव देणारे आहे. असत्यापासून सुरू झालेले नाते कुठवर जाते हे पाहणे मजेशीर असेल.

Advertisement

कलाकारांचा भरणा

या चित्रपटात लिलेट दुबे, सुधीर पांडे, गोविंद नामदेव, गोपी भल्ला, नयनी दीक्षित, विश्वनाथ चटर्जी, रोहित चौधरी यासारखे दमदार कलाकार असून ते स्वत:च्या कमाल अभिनयाद्वारे कहाणीला आणखी मजेशीर स्वरुप देतात. झी स्टुडिओज आणि साउंड्रिया प्रॉडक्शनचा चित्रपट ‘गिन्नी वेड्स सन्नी 2’ची निर्मिती विनोद बच्चन आणि उमेश कुमार बंसल यांनी केली आहे. प्रशांत झा यांच्याकडून लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.