गिन्नी वेड्स सनी 2 ची घोषणा
यामी-विक्रांतच्या जागी नव्या जोडीची निवड
निर्माते विनोद बच्चन यांनी स्वत:चा आगामी कॉमेडी-रोमँटिक चित्रपट ‘गिन्नी वेड्स सनी’चा सीक्वेल जाहीर केला आहे. याचबरोबर निर्मात्याने ‘गिन्नी वेड्स सनी 2’ चित्रपटातील कलाकारांची नावे उघड केली आहेत. ‘गिन्नी वेड्स सनी’ हा चित्रपट 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विक्रांत मैसी आणि यामी गौतम ही जोडी दिसून आली होती.
तर सीक्वेलमध्ये अविनाश तिवारी आणि मेधा शंकर ही नवी जोडी दिसून येणार आहे. या चित्रपटाची कहाणी प्रशांत झा यांनी लिहिली असून तेच याचे दिग्दर्शन करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती सौंदर्य प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत होणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण उत्तराखंडमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटात उत्तराखंडमधील सुंदर दृश्यं दाखविली जाणार आहेत. रोमान्स, कॉमेडी आणि ड्रामाच्या रोलरकोस्टरसाठी तयार व्हा, कारण गिन्नी वेड्स सनी 2 चे चित्रिकरण सुरू झाले आहे. एका अद्भूत टीमसोबत या प्रवासाला सुरू करण्यासाठी उत्साहित असल्याचे अविनाशने म्हटले आहे.