For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गिल मांगे मोअर...

06:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
गिल मांगे मोअर
Advertisement

भारताच्या ईशान्य पूर्वेकडील आसामच्या गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर बुधवारी धावांचा अक्षरश: पाऊस बरसला. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुस्रया एकदिवसीय सामन्यात फटक्यांची आतषबाजी आणि त्याचबरोबर गोलंदाजांची केविलवाणी अवस्था पाहायला मिळाली. खेळपट्टीकडून चेंडूला ना उसळी, ना फिरका। ना वेग.. या पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांचा  ‘बाक’ निघाला. चेंडू अगदी सहजपणे बॅट वर येत असल्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहून प्रेक्षक सुखावले असणार यात शंका नाही. तथापि ही बाब क्रिकेटसाठी आश्वासक व पोषक नाही हे निश्चित...

Advertisement

अशी पाटा खेळपट्टी म्हणजे गोलंदाजावर सरळ सरळ अन्याय आहे, संबंधितांनी याचा जरूर विचार करावा. खरे क्रिकेट म्हणजे बॅट आणि बॉल यांच्यातील द्वंद्व...

कर्णधार शुभमन गिलने कर्णधारास साजेशी द्विशतकी खेळी करून संघास मोठा विजय सहज मिळवून दिला. रोहित शर्माने शतकी खेळी करून दर्जा आणि अनुभव याचे सुरेख प्रात्यक्षिक दाखवून दिले. हे सर्व चित्र आश्वासक असले तरी भारताची गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. भेदक चेंडू टाकून हमखास बळी टिपणाऱ्या खात्रीच्या गोलंदाजांची वानवा आहे. निवड समितीने यासाठी मेहनत आणि तयारी करून घेऊन या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे  पुढील वर्षी विश्वचषक स्पर्धा आहे. भारताकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे दर्जेदार गोलंदाजांची फळी उभी करणे क्रमप्राप्त आहे. तत्पूर्वी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाबरोबर सामने आहेत ही उत्तम संधी आहे.

Advertisement

गुवाहाटी येथील सामन्यात भारताने केवळ मोठा विजय मिळवला, असे नाही तर या सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित झाले. या सामन्यात 811 धावांचा पाऊस पडला आणि अनेक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित झाले.

सामन्यातील मुख्य विक्रम आणि ठळक मुद्दे

यशस्वी पाठलाग : भारताने वेस्ट इंडिजचे 406 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले (एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वोच्च यशस्वी पाठलाग).

शतकांची नोंद : सामन्यात एकूण 5 शतके झळकावली गेली (एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात 5 शतके होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे).

शुभमन गिलची खेळी : गिलने 117 चेंडूत नाबाद 223 धावा केल्या. (वनडेत धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोच्च्य वैयक्तिक धावसंख्या आहे).

वेस्ट इंडिजची सर्वोच्च धावसंख्या : वेस्ट इंडिजने 7 बाद 405 धावा करत एकदिवसीय सामन्यात प्रथमच 400 चा टप्पा ओलांडला.

रोहित शर्माचा पराक्रम : रोहित शर्माने 101 धावा केल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला.

द्वितशकी भागीदारी : रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात 255 धावांची विक्रमी सलामीची भागीदारी झाली.

इतिहासातील दुसरा मोठा यशस्वी पाठलाग : भारताने 406 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे (सर्वोच्च : दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया, 438 धावा, 2006).

भारताचा आजवरचा सर्वात मोठा पाठलाग : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा धावांचा यशस्वी पाठलाग करतानाचा सर्वात मोठा विक्रम आहे. यापूर्वी 2013 मध्ये जयपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 362 धावांचा पाठलाग हा भारताचा सर्वोत्तम रेकॉर्ड होता.

सर्वाधिक वेळा 400+ धावसंख्या : भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 व्या वेळेस 400 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आणि दक्षिण आफ्रिकेचा (8 वेळा) विक्रम मोडला.

तिसऱ्यांदा सामन्यात सर्वोच्च धावा : या सामन्यात दोन्ही डावांचे मिळून एकूण 811 धावा झाल्या, जो एकदिवसीय इतिहासातील तिसरा सर्वात मोठा एकूण स्कोअर आहे.

फलंदाजांचे वैयक्तिक विक्रम

धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या : गिलने धावांचा पाठलाग करताना एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक 223 धावा कुटल्या. त्याने ग्लेन मॅक्सवेलचा (ना. 201 धावा वि. अफगाणिस्तान) विक्रम मोडीत काढला.

-उदय बिनीवाले

Advertisement
Tags :

.