For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गिल, सिना अंतिम फेरीत

06:22 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
गिल  सिना अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र खुल्या चॅलेंजर 75 टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा फेलिक्स गिल आणि इटलीचा फेडेरिको सिना यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली. येथील म्हाळुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात ब्रिटनच्या फेलिक्स गिलने लिथुनियाच्या इडेस बटव्हिलासचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 100 मिनिटे चालला होता. या सामन्यात गिलने पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये प्रत्येकी दोन वेळेला बटव्हिलासची सर्व्हिस तोडली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इटलीच्या सिनाने क्रोएशियाच्या अॅड्युकोव्हीकचा 7-5, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. हा उपांत्य सामना 75 मिनिटे चालला होता.

कोरियाचा चौथा मानांकित जीसंग नॅमने फिनलँडच्या पेट्रीक सेलमिनेन समवेत दुहेरीचे जेतेपद मिळविताना इसारो आणि निकी पुनाचा यांचा 6-4, 6-7 (1-7), 10-7 असा पराभव केला. पुरुष दुहेरीतील विजेत्या जोडीला 4,980 डॉलर्सचे बक्षीस विभागून देण्यात आले असून या जोडीला प्रत्येकी 75 एटीपी गुण मिळाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.