ब्रॅडली कूपरसोबत रिलेशनशिपमध्ये गिगी हदीद
अमेरिकन फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन आर्टिस्ट गिगी हदीदने सोशल मीडिया हँडल्सवर खास छायाचित्र शेअर करत ब्रॅडली कूपरसोबतच्या रिलेशनशिपची वाच्यता केली आहे. या छायाचित्रामुळे दोघेही परस्परांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गिगी ही जगप्रसिद्ध मॉडेल असून तिचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. तर ब्रॅडली हा हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. ब्रॅडली आणि गिगीच्या चाहत्यांना या रिलेशनशिपच्या अधिकृत घोषणेमुळे निश्चितच आनंद झाला असणार आहे.
गिगी आणि ब्रॅडली यांच्या जोडीला पहिल्यांदा ऑक्टोबर 2023 मध्ये एकत्र पाहिले गेले होते. अलिकडेच गिगीच्या बोटात सोन्याची अंगठी पाहिल्यावर तिच्या एंगेजमेंटची अफवा पसरली होती. ब्रॅडलीसोबतचे नाते रोमँटिक आणि परिपक्व असून यात आम्ही दोघेही परस्परांना साथ देत असतो. ब्रॅडलीच्या विचार करण्याच्या क्षमतेचे मला मोठे अप्रूप आहे, त्याच्यासोबतच्या नात्यामुळे मी स्वत:ला अत्यंत भाग्यशाली मानत असल्याचे गिगी हदीदने म्हटले आहे.