For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताला औषधी वनस्पतींचे वरदान

11:25 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताला औषधी वनस्पतींचे वरदान
Advertisement

एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे रुग्णावर उपचारही

Advertisement

बेळगाव : भारतीय पारंपरिक वैद्यकीय शास्त्रामध्ये आयुर्वेदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारताला औषधी वनस्पतींचे वरदान लाभले असून आजसुद्धा आयुर्वेद उपचाराकडे लोकांचा कल आहे हे लक्षात घेऊन एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलने आजपर्यंत विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे शिक्षण देण्याबरोबरच रुग्णांवरही उपचार केले आहेत, अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व प्राचार्य डॉ. अडिवेश अरकेरी यांनी दिली. शुक्रवारी सकाळी कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, माजी आमदार एस. बी. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली 2017 मध्ये एसबीजी हॉस्पिटलची तर 2019 मध्ये कॉलेजची स्थापना झाली. आजपर्यंत 80 हजाराहून अधिक रुग्णांवर आम्ही उपचार केले आहेत. व 400 हून अधिक मोफत आरोग्य शिबिरे घेतली आहेत.

हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद, योग, फिजिओथेरपी, पंचकर्म, मधुमेह, स्थुलत्व, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग यासह अनेक विभाग कार्यरत आहेत. हॉस्पिटलची स्वत:ची प्रयोगशाळा असून स्वतंत्र असा एक्सरे विभाग व ऑपरेशन थिएटर आहे. आयुर्वेद व अॅलोपॅथी यांची सांगड घालून रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत यासाठी अॅलोपॅथीमधील तज्ञ डॉक्टर येथे सेवा देत आहेत. शिवाय हॉस्पिटलचे स्वत:चे 40 तज्ञ डॉक्टर आहेत असेही त्यांनी सांगितले. दारिद्र्या रेषेखालील लोकांचा विचार करून 60 बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये 20 बेड्स स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. येथे सर्व उपचार विनामूल्य असून गरिबांना व दुर्बल घटकातील रुग्णांना याचा लाभ व्हावा हा हेतू आहे. अलीकडे प्रत्येकाला त्वरित वेदनाशामक उपचार लागतात हे लक्षात घेऊन ‘इन्स्टंट पेन रिलिफ’ अंतर्गत अग्नीकर्म, लिचथेरपी व कपिंग थेरपी असे उपचारही देण्यात येत असल्याचे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिल कुरंगी यांनी सांगितले. याप्रसंगी अमोल जैन व अन्य डॉक्टर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.