For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदांत फाउंडेशनतर्फे 1700 पुस्तके भेट

11:24 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेदांत फाउंडेशनतर्फे 1700 पुस्तके भेट
Advertisement

बेळगाव : वेदांत फाऊंडेशनवतीने कावळेवाडी येथील म. गांधी वाचनालय व शहरातील मराठी-कन्नड माध्यमांच्या 5 शाळांना सुमारे 1700 पुस्तके भेट देण्यात आली. टिळकवाडी येथील शाळा क्र. 9 मध्ये बुधवारी कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक सतीश पाटील, सरकारी नोकर संघाचे  असिफ अत्तार, कावळेवाडी येथील वाचनालयाचे सतीश जाधव, सरकारी ग्रंथालय विभाग शाखा टिळकवाडीचे  संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. पुस्तकांसाठी माऊती गल्ली येथील ग्रंथालयाचे राजशेखर कट्टीमनी यांचे सहकार्य लाभले.

Advertisement

मुख्याध्यापक पाटील म्हणाले, कावळेवाडी येथील वाचनालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. या वाचनालयाला पुस्तके दिली आहेत. शहरातील ज्या शाळांचे स्वत:चे ग्रंथालय आहे, त्यांना व अन्य शाळांना पुस्तके वितरित केली आहेत. असिफ अत्तार म्हणाले, वेदांत फाऊंडेशनचा हा उपक्रमही स्तुत्य आहे. एक वाचनालय व शहरातील काही ग्रंथालयांना त्यांनी ही पुस्तक स्वऊपात मदत केली आहे. याप्रसंगी कन्नड मुलांची शाळा टिळकवाडी क्र. 5, चिंतामणराव हायस्कूल शहापूर, केबीएस क्र. 5, टिळकवाडी, केएचपीएस क्र. 8 कचेरी गल्ली, शहापूर, चन्नम्मानगर येथील शाळांना पुस्तके देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.