जायंट्स पदाधिकाऱ्यांची माहेश्वरी शाळेत रंगपंचमी
12:24 PM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : रंगपंचमी हा सण विविध प्रकारच्या रंगांची मनसोक्त उधळण करत आनंद साजरा करण्याचा दिवस. पण ज्यांना दृष्टी नाही त्यांनी हा सण कसा साजरा करावा, म्हणून त्यांच्या सोबत रंगांची उधळण करण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह माहेश्वरी अंध शाळेत जाऊन त्या सर्व मुलांसोबत रंगपंचमी साजरी केली. मुलांना दिसत नव्हते, पण हातावर ठेवलेल्या रंगांच्या नुसत्या स्पर्शाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा पसरल्या व हा आनंद पाहून आम्हा सर्वांना स्वर्ग सुखाचा आनंद मिळाला. मुलांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था उमेश पाटील यांनी केली. लस्सी संजय पाटील व लक्ष्मण शिंदे यांनी केली. चहा-नाष्टा महादेव केसरकर यांनी दिला. या उपक्रमास जायंट्सचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
Advertisement
Advertisement