पत्नीच्या निधनाचा धक्का, पतीला हृदयविकाराचा झटका; 14 व्या दिवशी घेतला जगाचा निरोप
कौलव : पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पतीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घोटवडे (ता. राधानगरी) येथे घडली.
लक्ष्मीबाई आनंदा डोंगळे यांचे 11 सप्टेंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनाला अवघे 14 दिवस होत असतानाच, बुधवार, 23 सप्टेंबर रोजी त्यांचे पती आनंदा दत्तात्रय डोंगळे (वय 79) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
पती-पत्नीच्या अवघ्या 14 दिवसांच्या अंतराने झालेल्या निधनामुळे डोंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने घोटवडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आनंदा डोंगळे यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते गोकुळचे कर्मचारी दत्तात्रय डोंगळे, गणपतराव डोंगळे पतसंस्थेचे कर्मचारी पांडुरंग डोंगळे यांचे वडील होत.
पती-पत्नीने आयुष्यभर जपलेली साथ मृत्यूनंतरही कायम राहिल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आनंदा डोंगळे यांचे रक्षाविसर्जन गुरुवारी, 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता घोटवडे येथे होणार आहे.