महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

घोडावत यांची फसवणूक, आरोपींच्या मालमत्ता जप्त

11:10 AM Jul 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ईडीकडून दोघा आरोपींवर कारवाई

Advertisement

वार्ताहर /हुबळी

Advertisement

उद्योजक संजय घोडावत यांची कोट्यावधी ऊपयांची फसवणूक केल्याप्रकरणी  अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपींची 40.22 कोटी रुपये किमतीच्या 12 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्ता शीतलकुमार मनेरे यांच्या कुटुंबीयांच्या आणि शीतल जिनेंद्र मगदूम यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील जमीन, व्यापारी संकुल, विंड मिल, निवासी संकुल अशा एकूण 12 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी रियल इस्टेट व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने स्टार एअरलाईन्सचे मालक आणि घोडावत ग्रुपचे प्रमुख उद्योजक संजय घोडावत यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी घोडावत यांनी शीतलकुमार, शीतल मगदूम, स्वाती प्रसाद दळवी यांच्यासह एकूण 15 जणांविरुद्ध हुबळीतील अशोकनगर, कमरीपेठ पोलीस स्थानक, धारवाड उपनगर पोलीस स्थानकात जून 2018 मध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार आरोपींविरुद्ध 12 एफआयआर दाखल करण्यात आले होते.

हे प्रकरण न्यायालयाने ईडीकडे सोपविले. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने शीतलकुमार मनेरे आणि शीतल मगदूम यांच्या महाराष्ट्रातील इचलकरंजी, पनवेल आणि मध्यप्रदेशातील मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच पवन विद्युत निर्मितीसंबंधी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशातील मालमत्ताही जप्त केली आहे. या प्रकरणातील प्रथम आरोपी प्रोप्रा. देवश्री एन्टरप्रायझेसच्या स्वाती प्रसाद दळवी यांनी शीतलकुमार मनेरे यांच्यासह इतर आरोपींसमवेत कारस्थान रचून तक्रारदार संजय घोडावत यांच्याकडून 4.95 कोटी रुपये विविध डेव्हलपर्सकडे रिअल इस्टेट व्यवसायात गुंतविण्यात भाग पाडले. मात्र, आरोपींनी ही रक्कम अन्यत्र वळवून मनेरे, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि शीतल मगदूम व इतर व्यक्तींच्या वैयक्तिक खात्यावर जमा केली. ही रक्कम परत मागितली असता आरोपींनी धमकावल्याचा आरोप फिर्यादी संजय घोडावत यांनी केला होता. या प्रकरणाचा ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article