Kolhapur News : वारणा दूध संघामार्फत सभासदांना तूप भेट : डॉ. विनय कोरे
दहा तारखेपासून तूप वाटप ; अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांची माहिती
कोल्हापुर : येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने दीपावली निमित्त सभासदांना प्रति वर्षी प्रमाणे तूप देण्यात येणार आहे. याचे वाटप दि.१० ऑक्टोबर पासून करणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
तूप बाटप सुरू झाल्यापासून दि. २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये संबंधित प्राथमिक दूध संस्था संघाची वितरण केंद्रे व वितरक यांच्यामार्फत संघाच्या सभासदांना तूप वाटप करण्यात येणार आहे वारणा दूध सघाच्या ज्या अ बग सभासदाना शअर पूर्ण केले आहेत व जे उत्पादक दुधाचा गावातील दूध संस्थांमार्फत संघास पुरवठा करतात अशा अ वर्ग सभासदांना व ब वर्ग संस्था सभासदांना व राज्यभरातील क वर्ग ग्राहक सभासदाना संघामार्फत दरवर्षी महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, व दिपावली या सणाना सवलतीचे दरात तूप भेट म्हणून दिले जाते असे अध्यक्ष डॉ. कोरे यांनी सांगितले.
वारणा दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थांच्याकडे सभासदांना दि १० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत तूप वितरण केले जाणार आहे. सभासदाचे सोईचे दृष्टीने कोल्हापूर येथील अवक बर्ग सभासद यादी क्रमांकानुसार बाटप करणेत येणार आहे. या मुदतीमध्ये ज्या सभासदांना तूप घेता आले नाही त्यांना दि २३ रोजी पासून कोल्हापूर विक्री केंद्रातून तूप देणेची व्यवस्था करणेत आली आहे असे आमदार डॉ. विनय डॉ. कोरे यांनी सांगितले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाळे, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, संकलन व्यवस्थापक अशोक पाटील, असि मॅनेजर अर्कोटस प्रविण शेलार, असि मॅनेजर मार्केटिंग आर व्ही देसाई, प्रितीन बासटवार, उत्तम कणेरकर, सचिन माने आदी उपस्थित होते.
व्हॉटस्अप मेसेज पाठविण्याची व्यवस्था
कोल्हापूर येथील अ वर्ग व सर्व क वर्ग सभासदांना या बाबत मोबाईल वरुन व्हटसॅप मेसेज पाठविणेची व्यवस्था केली आहे. सभासदांनी आपले ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्राची झेरॉक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप घेऊन जावे असे आवाहन प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले आहे.