For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवास उत्साहात प्रारंभ

04:57 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवास उत्साहात प्रारंभ
Advertisement

                             घटस्थापनेने सुरू झाला सात दिवसांचा शाकंभरी नवरात्र महोत्सव

Advertisement

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवार, २८ डिसेंबर रोजी घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली आणि सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली

श्री तुळजाभवानी देवींचे दरवर्षी दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात, त्यामध्ये अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव व पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र उत्सवाचा समावेश आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवाला तुळजापुरात 'धाकटा दसरा' असेही म्हटले जाते. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा संपवून आज पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवींची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात
तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली.
आली.

Advertisement

याप्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत (बंडू) पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्रोच्चार, विधी आणि भक्तीभावाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता. सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता ३ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमिला दुपारी १२ वाजता पूर्णाहुती व त्यानंतर घटोत्थापनाने होणार आहे. तसेच शाकंभरी नवरात्र काळात दररोज रात्री श्री तुळजाभवानी देवींचा छबीना (मिरवणूक) निघणार आहे. संपूर्ण तुळजापूर नगरी भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेली आहे.

Advertisement
Tags :

.