For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीचा व्हेरेव्ह मानांकनात अग्रस्थानी

06:50 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीचा व्हेरेव्ह मानांकनात अग्रस्थानी
Advertisement

वृत्तसंस्था, व्हिएन्ना

Advertisement

येत्या सोमवारी घोषित होणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या ताज्या एटीपी मानांकनात जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्ह अग्रस्थानावर राहिल. येथे सुरु असलेल्या इरेस्टी बँक खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत व्हेरेव्हने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले असल्याने त्याचे मानांकनातील अग्रस्थान जवळपास निश्चित झाले आहे.

व्हेरेव्हने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रिकस्पूरचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. एटीपीच्या मानांकनात यापूर्वी इटलीचा जेनिक सिनर पहिल्या स्थानावर होता. आता सोमवारच्या ताज्या मानांकन यादीत व्हेरेव्ह अग्रस्थानावर राहिल.

Advertisement

Advertisement
Tags :

.