For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांच्याकडून जर्मनीची दुहेरी कोंडी

06:42 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांच्याकडून जर्मनीची दुहेरी कोंडी
Advertisement

देशातून हजारो सैनिक मागे घेतले : वाहनांवर 25 टक्के शुल्क जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जर्मनीबाबतची भूमिका पुन्हा एकदा कठोर होत असल्याचे दिसत आहे. सैन्यकपात आणि वाहनांवर अतिरिक्त कर अशा दुहेरी माध्यमातून अमेरिकेकडून जर्मनीची कोंडी सुरू आहे. जर्मनीमध्ये तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांची संख्या केवळ 5,000 पर्यंत मर्यादित राहणार नाही, तर त्यात आणखी मोठी कपात केली जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. सुरुवातीला मागे घेण्यात आलेले 5,000 सैनिक आणखी मोठ्या संख्येने मागे घेतले जाऊ शकतात. यापूर्वी, ट्रम्प यांनी युरोपियन युनियनच्या गाड्या आणि ट्रकवर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणाही केली होती. या निर्णयाचा जर्मनीवर विशेष परिणाम होऊ शकतो.

Advertisement

व्यापार करारांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे ट्रम्प नाराज असल्याचे मानले जात आहे. युरोपियन युनियनने आपली आश्वासने पाळली नसल्यामुळे पुढील आठवड्यापासून तेथे उत्पादित होणाऱ्या गाड्या आणि ट्रकवर 25 टक्के कर लादला जाईल. वाहन निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जर्मनी देशासाठी हा निर्णय एक मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाला अमेरिकेतही विरोध सुरू झाला आहे.

Advertisement
Tags :

.