कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जेनिटो कार्दोजचा जामीन अर्ज फेटाळला

06:55 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खास प्रतिनिधी / पणजी

Advertisement

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याचा जामीनअर्ज मेरशी येथील  विशेष न्यायालयाचे न्या. इर्शाद आगा यांनी फेटाळला आहे. कार्दोझ याच्यासह आठजणांची न्यायालयीन कोठडी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Advertisement

जेनिटोचे वकील मायकल नाझारेथ यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद करताना न्यायालयासमोर तो निर्दोष असून त्याने या प्रकरणी काहीही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. पोलिसांचे तपासकाम संपुष्टात आले असल्याने जेनिटोला आणखी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही. आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याचा दावा खोटा असून राज्य सरकारने असे कधीच जाहीर केलेले नाही. हिस्ट्री शीटर बनण्यासाठी किमान तीन गुह्यात तो तीनवेळा दोषी म्हणून आदेश असणे जरूर असून या प्रकरणी तसे झालेले नाही. मोबाईलमधला व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल लॉग्स नष्ट झालेले असेल तर परत मिळवणे हे पोलिसांचे काम आहे. आरोपी आणि पीडिताची कोणतीही दुष्मनी नसल्याने जेनिटोला जामिनावर सोडण्याची त्यांनी विनंती केली.

या दाव्याला विरोध करताना सरकारी वकील रॉय डिसोझा यांनी, पोलिस तपास अजूनही सुऊ असल्याने आणखी काही वेळ लागणार आहे. आरोपीने केलेला  हल्ला हा भीषण आणि गंभीर असून त्यामुळे जनतेत भय निर्माण झाले आहे. आरोपी हा हिस्ट्री शीटर असून तो 19 गुन्हेगारी प्रकरणात

गुंतलेला आहे. शिरदोन येथे झालेल्या टोळी युद्धात तो दोषी सापडला असून दुसऱ्या एका प्रकरणी सुनावणी न्यायालयात सुऊ आहे. त्याला जामिनावर सोडल्यास तो आणखी काही पुरावे नष्ट करेल अथवा साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसेच आरोपींची अजून ओळख परेड होणे बाकी असल्याने त्याची कोठडी जऊरी असल्याचे त्यांनी सांगितले.

 जेनिटोच्या आदेशावरूनच हल्ला : न्यायालय

न्यायालयाने आपल्या निवाड्यात म्हटले आहे, की जामीन अर्जदार जरी हल्ला होतेवेळी घटनास्थळी नसला तरी अन्य काही आरोपींनी त्याच्या आदेशावरूनच हल्ला केल्याची  कबुली दिलेली आहे. उलट जेनिटोनेच सहकाऱ्यांना करंझाळे येथे जाऊन हल्ला करण्याचा आदेश दिल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपीने त्याच्या मोबाईलमधला व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल लॉग्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. उच्च न्यायालयाने नुकतेच त्याला एका प्रकरणात दोषी धरून सजा कायम केली आहे. त्यामुळे जेनिटोचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला असल्याचा निकाल न्या. इर्शाद आगा यांनी दिला.

रामाचा खून करण्याचा होता डाव -वकिलाचा दावा

रामा काणकोणकर यांचे  वकील अॅड. शाना गोम्स यांनी आरोपी हा दोन व्यक्तीच्या खुनासह आणखी काही गुह्यांत त्याचा हात आहे. रामावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असून  आपल्या सहकाऱ्यांसह रामाचा खून करण्यासाठी अर्जदाराने सह-आरोपींसह गुन्हेगारी कट रचला होता. अर्जदार हा सराईत गुन्हेगार  असल्याने तो साक्षीदारांना धमकावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी शक्यता आहे म्हणून, जामिनासाठीचा त्याने केलेला अर्ज फेटाळण्याची विनंती त्यांनी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article