For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा समितीच्या सामान्यज्ञान स्पर्धेला तुफान प्रतिसाद

11:06 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
युवा समितीच्या सामान्यज्ञान स्पर्धेला तुफान प्रतिसाद
Advertisement

3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग : युवा समितीचे तगडे नियोजन

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये बेळगावसह आसपासच्या भागातील 3 हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले हेते. तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचे बीज रोवण्यात आले. मंगळवारी मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. व्यापारी व म. ए. समितीचे नेते रमेश पावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी समितीचे नेते आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, आप्पासाहेब गुरव, माजी नगरसेवक पंढरी परब, अमर यळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, अॅड. सुधीर चव्हाण, वाय. पी. नाईक, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, जिजामाता महिला बँकेच्या अध्यक्षा लता पाटील, भारती किल्लेकर, शिवानी पाटील, विश्वजित हसबे, विलास बेळगावकर, श्रीधर जाधव, उमेश पाटील, प्रशांत पाटील, विकास मांडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

Advertisement

मालोजी अष्टेकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आजची गरज ओळखून तसेच सीमाभागातील मराठीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अशा महत्त्वपूर्ण स्पर्धा भरविल्याबद्दल कौतुक केले. सीमाभागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी तसेच शिवरायांचा इतिहास आत्मसात करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन गटांमध्ये 3 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षक तसेच पालकांनीही या परीक्षेला उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, चिटणीस साईनाथ शिरोडकर, प्रतीक पाटील, आशिष कोचेरी, आकाश भेकणे यासह मोठ्या संख्येने म. ए. समितीचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.