For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्लड कॅन्सरच्या उपचारात जीन थेरपी 73 टक्के प्रभावी

06:32 AM Mar 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
ब्लड कॅन्सरच्या उपचारात जीन थेरपी 73 टक्के प्रभावी
Advertisement

दिल्ली एम्ससह अनेक रुग्णालयांमध्ये परीक्षण

Advertisement

भारतात करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण अध्ययनात जीन थेरपीच्या माध्यमातून ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्यूकेमिया आणि लिम्फोमाने ग्रस्त रुग्णांच्या उपचारात 73 टक्के यशाचा दर प्राप्त झाल्याचे आढळून आले आहे. या संशोधनाला दिल्लीतील एम्स आणि मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयासह अनेक प्रमुख रुग्णालयांमध्ये परीक्षणानंतर निष्कर्षांमध्ये सामील करण्यात आले आहे. या अध्ययनाचे निष्कर्ष ‘द लॅन्सेट हेमाटोलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

टी-सेल्स म्हटले जाणाऱ्या जीन थेरपीत रुग्णाच्या प्रतिरक्षा पेशींना संशोधित केले जाते, जेणेकरून ते कॅन्सरशी लढू शकतील. या प्रक्रियेत टी-पेशींच्या जीनला बदलून त्यांना अधिक प्रभावी केले जाते, ज्यामुळे शरीरात कॅन्सरशी लढण्याची क्षमता वाढते. या थेरपीचा विशेष फायदा बी-सेल ट्यूमर जो प्रकारचा पांढऱ्या रक्त पेशीत वारंवार वाढत असतो आणि ज्याच्या उपचारात उर्वरित पर्याय उपयुक्त ठरत नाहीत अशा रुग्णांना होतो.

Advertisement

बी-सेल्स शरीराच्या प्रतिरक्षा प्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण या अँटीबॉडीज निर्माण करून शरीराला संक्रमणापासून वाचवितात. परंतु या पेशी जेव्हा कॅन्सरने संक्रमित होतात आणि उपचारानंतरही वाढू लागतात, तेव्हा अन्य उपचार अयशस्वी ठरू लागतात. अशा प्रकरणांमध्ये जीन थेरपी एक नवा आशेचा किरण ठरली आहे, यामुळे रुग्णांचा जीव वाचविला जाऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष पाहता जीन थेरपी ब्लड कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक प्रभावी आणि संभाव्य उपचार पर्याय ठरू शकतो हे स्पष्ट आहे.

लाखो रुग्णांना होणार लाभ

कॅन्सरसाठी भारताच्या पहिल्या जीन थेरपीच्या यशस्वी परिणामाने लाखो रुग्णांना एक नवा आशेचा किरण दाखविला आहे. भारतात इम्युनोएक्ट कंपनीने ही थेरपी उपलब्ध करविली जात आहे. सामान्य टी-पेशींप्रमाणेच हे देखील शरीरात दीर्घकाळापर्यंत कायम राहते. या अध्ययनादरम्यान आम्ही 73 टक्के रुग्णांमध्ये हा उपचार यशस्वी झाल्याचे पाहिले आहे. मागील 11 वर्षांपासून आमची पूर्ण टीम या संशोधनात कार्यरत आहे. औषध डिझाइन आणि प्रयोगशाळेत काम केल्यावर प्राण्यांवर अध्ययन झाले आणि मग भारतात क्लिनिकल ट्रायल सुरू झाले. इंजेक्शन टॅलिकॅब्टेजीन ऑटोल्यूसेल आता भारतात मान्यताप्राप्त असू नसुमारे 26 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे आयआयटीचे प्राध्यापक राहुल पुरवान यांनी सांगितले आहे.

2009 मध्ये सुरू झाला प्रयत्न

सीएआर-टी थेरपीवरून जगातील पहिला प्रयत्न अमेरिकन वैज्ञानिकांनी 2009-10 दरम्यान सरू केला. परंतु याला शासकीय अनुमती 2018 मध्ये देण्यात आली आणि याचदरम्यान भारतीय संशोधकांनी यावर स्वत:चे अध्ययन सुरू केले. भारतान केवळ 5 वर्षांमध्ये हे तंत्रज्ञान रुग्णालयांपर्यंत उपलब्ध करविले आहे. अमेरिका आणि भारतासह हे तंत्रज्ञान स्पेन, जर्मनी आणि चीनकडे आहे. हे तंत्रज्ञान कॅन्सर रुग्णाच्या इम्यून सेल्सवर आधारित आहे.

Advertisement
Tags :

.