6 वर्षांनी कमबॅक करणार गीता बसरा
हरभजन सिंहच्या पत्नीने स्वीकारला चित्रपट
गीता बसरा 6 वर्षांच्या काळानंतर मोठय़ा पडद्यावर परतणार आहे. गीताने निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांचा एक चित्रपट स्वीकारला आहे. बॉक्सवाला यांनी ‘शेरशाह’ हा चित्रपट निर्मित केला होता. गीता बसरा मागील काही काळापासून पती हरभजन सिंहसोबत स्वतःच्या कुटुंबाला पूर्ण वेळ देत होती. दुसरा मुलगा जोवन एक वर्षाचा झाल्याने तिने आता कारकीर्दीवर पुन्हा लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘नोटरी’ या चित्रपटात परमव्रत चॅटर्जी याची नायिका म्हणून गीता बसरा झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन वाडेयर करणार आहेत. याचे चित्रिकरण 45 दिवसांमध्ये एकाच सत्रात पूर्ण केले जाणार आहे. 5 ऑक्टोबरपासून भोपाळमध्ये याचे चित्रिकरण सुरू होणार आहे.
शब्बीर बॉक्सवाला यांनीच फोन करत मला चित्रपटातील भूमिकेची ऑफर दिली होती. ही भूमिका आवडल्याने मी ती स्वीकारली असल्याचे गीताने सांगितले आहे. चित्रिकरणादरम्यान माझा मुलगा माझ्यासोबतच राहणार आहे. तर मुलगी हिनाया पती हरभजन सोबत मुंबईत राहणार असल्याचे तिने म्हटले आहे. गीता बसरा यापूर्वी 2016 मध्ये ‘लॉक’ या चित्रपटात दिसून आली होती.