6.5 ते 7 टक्के राहणार जीडीपी दर -नागेश्वरन
वृत्तसंस्था/मुंबई
भारताचा विकासदर हा या आर्थिक वर्षांमध्ये 6.5 टक्के ते 7 टक्के इतका राहू शकतो असा अंदाज मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी वर्तवला आहे. जागतिक आर्थिक धोरण परिषद 2024 मध्ये ते बोलत होते. कॉन्फरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि वित्त मंत्रालयाच्या वतीने सदर फोरमचे आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये ते लवकरच भारत विकासाच्या दिशेने गतिमान होणार असून जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हाने पेलण्यासाठी भारताला सज्ज राहावे लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये विकासाला निश्चित अशी गती मिळू शकणार आहे. कल्पकता, वेतन वाढ आणि दर्जात्मक प्रणालीच्या माध्यमातून कार्यप्रणालीच्या माध्यमातून आर्थिक विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मेड इन इंडियासाठी दर्जात्मक कार्यप्रणाली अवलंबण्यासोबतच संशोधन आणि विकासामध्ये अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे असणार आहे.