For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसऱ्या तिमाहीत 8 टक्के राहणार जीडीपी दर: एसबीआयचा अहवाल

06:03 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिसऱ्या तिमाहीत 8 टक्के राहणार जीडीपी दर  एसबीआयचा अहवाल
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

तिसऱ्या तिमाहित भारताचा जीडीपी तर 8 टक्के इतका राहू शकतो, असा अंदाज एसबीआय रिसर्च यांच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये भारताचा जीडीपी तर 8.1 टक्के इतका राहणार असल्याचे एसबीआय रिसर्चने म्हटले आहे.

ग्रामीण भागातील वाढती मागणी त्याचप्रमाणे उत्तम शेती पिके घेतली गेल्याच्या पार्श्वभूमीवरती देशाचा जीडीपी दर चांगला राहू शकतो. भारताचा जीडीपी दर सदरच्या तिमाहीत 8.1 टक्केच्या आसपास राहू शकतो असेही एसबीआयने म्हटले आहे. उत्सवी काळानंतरच्या काळामध्ये पाहता शहरी भागामध्ये वस्तूंच्या वापरामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.