बारावी परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातून गायत्री वरगावकर प्रथम
वेंगुर्ले (वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला वेंगुर्ले तालुक्यातून 642 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 624 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल ९७.१९ टक्के लागला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील बा. म. गोखले कनिष्ठ महाविद्यालयातील एमसीव्हीसी शाखेची विद्यार्थिनी गायत्री वरगांवकर हिने 90 टक्के गुण मिळवित वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिचे तालुक्यात सर्व शहरातून अभिनंदन होत आहे.तांत्रिक संकुलची वेंगुर्ला तालुक्यात पहिली आलेली त्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक मंगेश उर्फ आबा कांबळी यांनी खास तिच्या घरी जाऊन कु.गायत्री वरगावकर हिचे तिला पेढा भरवत अभिनंदन केले. यावेळी तांत्रिक संकुलचे शिक्षक दिलीप पणशीकर तसेच गायत्रीचे आई-वडील उपस्थित होते.