गौतम खट्टर यांच्या यापूर्वीच्या वक्तव्यांचा तपासात समावेश
02:46 PM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : वास्को येथील एका कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावरील वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर गुन्हे शाखेने गौतम खट्टर यांना ताब्यात घेतल्याने, आता तपास अधिकारी त्यांच्या पूर्वीच्या सार्वजनिक वक्तव्यांचा आणि कृतींचाही तपासात समावेश करत आहेत. रविवारी त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून सहा दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. काल सोमवारी गौतम खट्टर यांचे भाऊ माधव खट्टर यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने काल सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनुसार, खट्टर यांनी विविध राज्यांमध्ये दिलेली पूर्वीची भाषणे या प्रकरणाला संदर्भ देतात का आणि त्यामुळे कोणत्याही पुढील कायदेशीर कार्यवाहीवर परिणाम होऊ शकतो का, याचे विश्लेषण तपास अधिकारी करणार आहेत.
Advertisement
Advertisement