छातीत दुखू लागल्याने गौतम खट्टर इस्पितळात
03:45 PM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
म्हापसा : वास्को येथील कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावरील वक्तव्यावरून अटक करण्यात आलेल्या डॉ. गौतम खट्टर यांच्या छातीत दुखू लागल्याने काल मंगळवारी सायंकाळी त्यांना म्हापसा येथील जिल्हा आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना अॅडमिट करून घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पत्रकारांनी गौतम खट्टर यांच्याशी पत्रकारांना संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘जय जय श्रीराम’ असा जयघोष केला.
Advertisement
Advertisement