For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौतम गंभीर नवे प्रमुख प्रशिक्षक

06:45 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
गौतम गंभीर नवे प्रमुख प्रशिक्षक
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

वनडे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. राहुल द्रविड यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताने अलीकडेच झालेला टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांनी प्रशिक्षकपद सोडले होते. ‘आम्हास सांगण्यात अत्यानंद होत आहे की, गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये वेगाने बदल झाले असून गंभीर यांनी हा बदल जवळून पाहिला आहे. कारकिर्दीत विविध भूमिका यशस्वीपणे पार पाडलेले गंभीर ही भूमिका नक्कीच यशस्वीरित्या पार पाडण्यात योग्य व्यक्ती आहेत, असा मला विश्वास वाटतो. भारतीय क्रिकेटला ते आणखी पुढे नेतील, अशी मी आशा करतो,’ असे बीसीसीआय सचिव जय शहा म्हणाले.

Advertisement

त्यांची दूरदृष्टी आणि मोठा अनुभव यामुळे ते ही जबाबदारी घेण्यास परिपूर्ण व्यक्ती आहेत. त्यांच्या या नव्या प्रवासात बीसीसीआयकडून त्यांना पूर्ण समर्थन मिळेल,’ असेही ते म्हणाले. 42 वर्षींय हे 2011 मध्ये विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2012 व 2014 असे दोनदा जेतेपद मिळवले. याशिवाय 2024 मध्ये झालेल्या केकेआरच्या आयपीएल जेतेपदातही त्यांनी मेन्टरची मोलाची भूमिका बजावली होती.

क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे, सुलक्षणा नाईक यांनी गंभीर यांची या पदासाठी एकमताने शिफारस केली. त्यांच्या नियुक्तीने भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू होत आहे. ते भारतीय संघाला योग्य मार्गदर्शन करतील, अशी आशाही शहा यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.