For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी विद्यार्थी गौरव शिर्के यांचा मिलाग्रीस हायस्कूलच्यावतीने सन्मान

05:48 PM Jan 15, 2026 IST | अनुजा कुडतरकर
माजी विद्यार्थी गौरव शिर्के यांचा मिलाग्रीस हायस्कूलच्यावतीने सन्मान
Advertisement

दशावतार कलेतील जागतिक स्तरावरील कामगिरीची दखल

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा माजी विद्यार्थी गौरव शिर्के यांच्या दशावतार कलेची जागतिक स्तरावर दखल घेतल्याचे औचित्य साधून गौरव शिर्के यांचा शाळेच्यावतीने शाल, सन्मानचिन्ह ,मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा, शैलेश नाईक, हेजल पिंटो, हायस्कुलच्या पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका टीचर क्लिटा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता, शारदा गावडे, अँटोनेट पिंटो, शेरॉन अल्फान्सो, हितेश मालंडकर, फ्लोरिंडा फर्नांडिस, अमोल राऊळ, स्वप्निल गोरे, दत्ताराम नाईक आदीसह ईतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शिक्षक दत्ताराम नाईक यानी गौरव शिर्के यांच्या दशावतार कलेतील चढत्या आलेखाचा आढावा घेतला. जागतिक स्तरावर भारत ,अमेरिका , इंग्लंड जपान , दुबई , स्पेन या सारख्या देशाने गौरव शिर्के यांच्या दशावतार केलेची दखल घेतल्यामुळे यावेळी पुर्ण शाळेने गौरव शिर्के यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी गौरव शिर्के यांनी ज्या शाळेत शिक्षणाचे धडे घेतले आणि शिस्त म्हणजे काय याची जाणीव अजूनही असून आपण या शाळेत बालवाडी ते दहावी पर्यतचे शिक्षण जिथे पुर्ण केले केल्याचे सांगून शाळेने आपला सन्मान केल्याबद्दल आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.