अमेरिकन टेनिस शौकिनांवर गॉफचे भाष्य
वृत्तसंस्था / पर्थ
सध्या येथे सुरू असलेल्या युनायटेड चषक सांघिक टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफला स्पेनच्या मॅनेरिओने अनपेक्षित पराभवचा धक्का दिला. या सामन्यावेळी उपस्थित असलेल्या अमेरिकन टेनिस शौकिनांवर गॉफने खराब टीका केली. यानंतर तिने या टीकेवर भाष्य करुन पडदा टाकला.
अमेरिका आणि स्पेन यांच्यातील युनायटेड चषक सांघिक टेनिस स्पर्धेतील झालेल्या लढतीत महिला एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या जेसिका मॅनेरिओने गॉफचा 6-1, 6-7 (3-7), 6-0 असा पराभव केला. त्यानंतर स्पेनने या स्पर्धेतील अ गटातील लढतीत अमेरिकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली. अमेरिका या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. त्यानंतर अमेरिकेच्या टेलर फ्रित्झने पुरूष एकेरीचा सामना जिंकून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. आता अमेरिकेची कोको गॉफ आणि ख्रिस्टेन हॅरीसन ही जोडी मिश्र दुहेरीचा सामना खेळणार आहे.
महिला एकेरीच्या सामन्यावेळी पर्थमध्ये उपस्थित असलेल्या स्पेनच्या टेनिस शौकिनांनी हातात ध्वज घेवून मॅनेरिओला प्रोत्साहन दिले. मॅनेरिओने या शौकिनांचे आभार मानले. पण अमेरिकन शौकीन आपल्या देशाच्या टेनिसपटूंना प्रोत्साहन देताना दिसत नसल्याचे गॉफने टीका केली होती.
अमेरिकन संघाने युनायटेड चषक सांघिक टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अमेरिकेने या स्पर्धेत स्पेन आणि अर्जेंटिनावर विजय मिळविले आहेत. आता या स्पर्धेत पुढील फेरीसाठी अमेरिकन टेनिस शौकीनांनी पर्थमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून आपल्या देशाच्या टेनिसपटूंना निश्चित प्रोत्साहन देतील, अशी आशा गॉफने व्यक्त केली आहे. अमेरिका आणि स्पेन यांच्यातील लढतीममध्ये पुरूष एकेरीत अमेरिकेच्या फ्रित्झने स्पेनच्या मुनारचा 7-6 (7-4), 3-6, 7-6 (8-6) असा पराभव केला. त्यानंतर गॉफ आणि हॅरीसन यांनी मिश्र दुहेरीत स्पेनच्या जोडीचा 7-6 (7-5), 6-0 असा पराभव केला.