पाईपलाईनच्या गॅस जोडणीला गती,मात्र अजूनही सिलिंडर संख्या लाखात
कोल्हापूर जिल्ह्यात २०१८ पासून पाईपलाईनद्वारे गॅस वितरण प्रकल्पाला सुरुवात
सहा वर्षात पाईपलाईनद्वारे जोडणीची संख्या हजारातच
कोल्हापूरः बाळासाहेब उबाळे
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाद्वारे कोल्हापूरात गॅस वितरण प्रकल्प राबवला जात आहे. एचपीसीएल आणि ऑईल इंडिया या सरकारी कंपनीच्या भागीदारीतून हा प्रकल्प २०१८ पासून सुरु आहे.या सहा वर्षात पाईपलाईनच्या गॅसला गती मिळून मागणीही वाढली आहे. मात्र पाईपलाईनच्या गॅसची संख्या हजारात असून सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांची संख्या लाखात आहे.
देशातील प्रमुख मोठया शहराबरोबर लहान शहरातही पाईपलाईनद्वारे गॅस पुरवण्यात येत आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात 2018 पासून गॅस पाईपलाईन प्रकल्पाला सुरुवात झाली आहे .कोल्हापूर शहरा पाठोपाठ इचलकरंजी आणि जयसिंगपूर शहरात हा प्रकल्प कार्यान्वित आहे. पाईपलाईनद्वारे मिळणारा गॅस सिलिंडरपेक्षा माफक आणि सुरक्षित असल्याने कनेक्शनची मागणी वाढली आहे. सद्या तीनही शहरात कनेक्शनची संख्या हजारात आहे. येणाऱ्या काही वर्षात ही संख्या लाखात पोहोचेल असा विश्वास एचपीसीएल आणि ऑईल इंडिया या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गॅस पाइ@पलाईनची मागणी वाढत आहे. मात्र सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही लाखात आहे. पाईपलाईनच्या गॅसची जोडणी केलेल्या ग्राहकांनी सिलेंडरचे कनेक्शन बंद केले किंवा नाही याची माहिती कंपन्यांना किंवा पुरवठा विभागाकडे नाही. पाईपलाईनचे कनेक्शन असलेल्या ग्राहकांनी सिलिंडर सोडल्यास सिलिंडरच्या ग्राहकांची संख्या कमी होणार आहे. गॅस पाईपलाईनद्वारे मिळणारा गॅस किफायतशीर असल्याने भविष्यात त्याला मागणी वाढणार हे स्पष्ट आहे.
पाईलाईनद्वारे कनेक्शन
कोल्हापूर शहर- 21 हजार
इचलकरंजी - 10,000
जयसिंगपूर- 3,000
गॅस पाईपलाईनचे जाळे- कोल्हापूर,इचलकरंजी आणि जयसिंगपूर या तीन शहरात आतापर्यंत 400 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
गॅस पाईपलाईनचे फायदे-पर्यावरणपूरक
सुरक्षितता- हवेपेक्षा हलका असल्याने स्फोट होत नाही
गॅस संपण्याची चिंता नाही.मीटरप्रमाणे बील येते.
पाईपलाईनद्वारे सर्वाधिक कनेक्शन असलेली शहरे
मुंबई- 10 लाख
पुणे- 3 ते 4 लाख
गॅस दर - प्रती मीटर क्युब युनिट- 50 रुपये 30 पैसे
परवानगी मिळण्यात अडचणी
गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जागेची आवश्यकता आहे.कोल्हापूर शहरात लवकर जागा आणि महापालिकेची परवानगी मिळत नाही. यामुळे कोल्हापूर शहरात मुक्त सैनिक वसाहत आणि राजेंद्रनगर येथे खासगी जागेत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत.
गॅस कनेक्शन (सिलिंडर)
कंपनी सिंगल डब्बल व्यावसायिक
बीपीसीएल 1 लाख 89 हजार 863 2 लाख 76,960 5370
एचपीसीएल 2 लाख 94,503 3 लाख 55193 5581
इंडियन ऑईल 1 लाख 56,729 - 2224
कनेक्शनची अपडेट गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्याकडे
बीपीसीएल,एचपीसीएल आणि इंडियन ऑईल या कंपन्यांकडून ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. सिलिंडरच्या पुरवठ्यामध्ये सतत बदल होत असून याबाबतची अपडेट कंपन्यांकडे असते. यामुळे पुरवठा विभागाकडे संपूर्ण गॅस कनेक्शनची संख्या उपलब्ध होऊ शकत नाही.
मोहिनी चव्हाण- जिल्हा पुरवठा अधिकारी
झोपडपट्टीत पाईपलाईनद्वारे पुरवठा करण्यात अडथळा
झोपडपटीतील सस्ते अरुंद आहेत.यामुळे पाईपलाईन टाकण्यासाठी त्याठिकाणी खुदाई करता येत नाही.तसेच दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही.यामुळे झोपडपटीत गॅस पाईपलाईन वितरणात अडथळा आहे.