सतर्क प्रशासनामुळे टळला गॅस गळतीचा धोका
रत्नागिरी :
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ एलपीजी गॅस टँकर 25 फूट दरीमध्ये कोसळल्यानंतर सुरू झालेल्या गॅस गळतीमुळे सोमवारी रात्री परिसरात एकच खळबळ उडाल़ी टँकरमध्ये 16 टन वजनी गॅस असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होत़ी मात्र प्रशासनाने वेळीच गॅस गळती रोखली अन् परिसरातील ग्रामस्थांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविल़े हा अपघात सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडला. सुरक्षेचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानी वळविण्यात आली होती. टँकरमधील गॅस काढण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर मंगळवारी दुपारी वाहतूक पूर्ववत करण्यात आल़ी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच हातखंबा शाळेजवळील वळण अतिशय धोकादायक आह़े 28 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोव्याचे दिशेने टँकर (एपी 39 टीएफ 0157) नेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पुलावरून थेट तब्बल 25 फूट खोल दरीत कोसळल़ा अपघातात टँकर चालक सय्यद पाशा (ऱा हैद्राबाद ) हा गंभीर जखमी झाल़ा
- गॅस गळतीच्या संकटाने परिसरात भितीचे वातावरण
अपघात इतका भीषण होता की, टँकर उलटताच त्यातून गॅसची गळती सुरू झाल़ी गॅसची दुर्गंधी वाणीवाडी तसेच नजीकच्या बौद्धवाडी परिसरात जाणवू लागली होत़ी दुर्घटनेच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होत़े गॅस गळती रोखण्यासाठी एमआयडीसीच्या अग्निशमन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आल़े पोलीस अधीक्षक नितीन बगाटे घटनास्थळी दाखल झाल़े त्यांनी गॅस गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात सुऊवात केल़ी महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याच्या सूचना केल्य़ा बगाटे यांच्यासोबत घटनास्थळी प्रांताधिकारी जीवन देसाई, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, तसेच प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होत़े
- विशेष पथकाकडून टँकरमधील गॅस काढण्याला सुरुवात
अपघातग्रस्त टँकरमधील गॅस अन्य वाहनामध्ये काढून घेणे प्रशासनासाठी मोठ्या जिकरीचे काम होत़े थोडीशी चूकदेखील मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकली असत़ी या सर्व कामामध्ये सुरक्षितता रहावी यासाठी मध्यरात्री पोलिसांचा मोठा बंदोबस्त अपघातस्थळी आणि हातखंबा तिठ्यावर तैनात करण्यात आला. घटनास्थळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही हजेरी लावली. गॅस गळतीमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी एमआयडीसीचे विशेष पथक, तीन अग्निशामक बंब, ऊग्णवाहिका, पोलीस आणि महसूल यंत्रणा एकत्रितपणे कामाला लागली. गॅसचा साठा दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये सुरक्षितरित्या भरण्याची करण्याची प्रक्रिया मध्यरात्री दोन वाजल्यापासून मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती.
- महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळविली
टँकरच्या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्य़ा वाहनचालकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत होत़ा दरम्यान, हातखंबा-पाली मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होते. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बावनदीमार्गे पालीकडे तर लांजा मार्गावरील वाहने कुवारबाव काजरघाटी मार्गे किंवा पावस मार्गे लांजा अशी वळवण्यात आली होती. सोमवारी रात्रीपासून गॅस गळती थांबविणे, गॅस दुसऱ्या वाहनामध्ये घेणे व नंतर टँकर बाहेर काढणे यासाठी मोठा कालावधी निघून गेल़ा अखेर मंगळवारी दुपारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करण्यात आला आणि गळतीचे सर्व स्रोत बंद केल्याची खात्री झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
- टँकर हटवण्यासाठी तीन भल्या मोठ्या क्रेन घटनास्थळी दाखल
टँकरमधील गॅस काढून घेतल्यानंतर टँकर बाहेर काढणे हेदेखील मोठे आव्हान प्रशासनासमोर होत़े यासाठी तीन भल्या मोठ्या क्रेन घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या होत्य़ा या क्रेनच्या सहाय्याने 25 फूट दरीत कोसळलेला टँकर बाहेर काढण्यात आल़ा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव रात्रीपासून घटनास्थळी ठाण मांडून बसले होत़े हातखंबा तिठ्यावर वाहने अडवून वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलीस तैनात ठेवून परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात ठेवण्यात आल़ी
- जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नागरिकांकडून कौतुक
अलीकडेच निवळी घाटात घडलेल्या गॅस टँकर अपघाताची आठवण ताजी असतानाच हातखंबा येथील ही दुसरी घटना प्रशासनासाठी आव्हान ठरली. मात्र पोलीस अधीक्षक नितिन बगाटे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होत़े गॅस गळतीसारख्या अत्यंत धोकादायक परिस्थितीत वेळेवर घेतलेले निर्णय तसेच स्वत: पोलीस अधीक्षक रस्त्यावर उभे राहिल्याने पोलीस यंत्रणा सजग दिसून आल़ी पोलीस अधीक्षकांचे स्थानिक रहिवांशांकडून कौतुक करण्यात आल़े
- स्थानिक रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले
काही आठवड्यांपूर्वी निवळी येथे गॅस टँकरमधून गॅस गळती झाल्याने जवळच्या घराने पेट घेतला होत़ा यामध्ये वाहने जळून खाक झाली होती तर गोठ्यामधील गुरे आगीमध्ये होरपळून गंभीर जखमी झाली होत़ी ही पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना तातडीने हटविण्याचा निर्णय घेतल़ा तसेच दोन्ही बाजूकडून रस्ता अडवून वाहनांची ये-जा बंद केल़ी यामुळे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करणे सोयीचे ठरल़े दरम्यान अपघातामध्ये जखमी झालेल्या टँकर चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आल़े त्याच्यावर रत्नागिरीतील खासगी ऊग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.