Kolhapur News: गॅस गिझर लिकेजमुळे नवदाम्पत्याचा गुदमरुन दु्र्दैवी मृत्यू, आजाऱ्यातील घटना
याबाबतची वर्दी संगम करमळकर यांनी आजरा पोलिसात दिली आहे
आजरा : गॅस गिझर लिकेजमुळे आजरा येथील सागर सुरेश करमळकर (वय 32) व सुषमा सागर करमळकर (वय 26) या नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाला. याबाबतची वर्दी संगम करमळकर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. याबाबत पोलिसातून तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सागर व सुषमा यांचा विवाह 20 मे रोजी पार पडला.
रविवारी हे नवदाम्पत्य फिरण्यासाठी आंबोली येथे गेले होते. आंबोली येथून ते रात्री भावेश्वरी कॉलनीतील घरी परतले. सोमवारी सकाळी शिवाजीनगर येथील कुटुंबीयांनी मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क केला, मात्र मोबाईल उचलला नाही. काही वेळानंतर मोबाईल स्वीच ऑफ येऊ लागल्याने नातेवाईक भावेश्वरी कॉलनी येथे गेले. त्यांनी सागर व सुषमा यांना हाका मारल्या, मात्र घरातून प्रतिसाद आला नाही.
घराचा दरवाजा बंद असल्याने आतमध्ये नेमके काय घडलं आहे ? याची माहिती मिळणे अशक्य झाले. त्यांनी याची माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडल्यानंतर आतून गॅसचा वास येत होता. गॅस गिझर लिक झाल्याचे निदर्शनास आले.
यामध्ये सागर व सुषमा दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. सागर व सुषमा यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी आजरा शहर आणि परिसरात पसरली. ही बातमी समजताच आजरा शहरातून मित्रांनी तसेच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
सागरच्या दुर्दैवी मृत्यूने आजरा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सपोनि नागेश यमगर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याची नोंद आजरा पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस