महामार्गालगत गॅस वितरण कंपनीचा ट्रक पेटला
03:26 PM Dec 14, 2024 IST
|
Pooja Marathe
Advertisement
पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गालगत पुलाची शिरोली येथील घटना
कोल्हापूर
पुणे बंगलूरु राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली औद्योगिक वसाहतीतील आयडीबीआय बँकेच्या शेजारी महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट जवळ असलेल्या महाराष्ट्र गॅरेज मध्ये थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रक ने पेठ घेतला. आणि एक गॅस टाकीचा स्फोट झाला आहे. या स्फोटात ट्रक व गॅरेजमधील साहित्य जळून नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. त्यामुळे मोठ्ठा अनर्थ टळला. ही घटना शनिवारी (दि. १४) रोजी दुपारी साडेबारा च्या सुमारास घडली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article