महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेशात 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर

06:48 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रक्षाबंधनापूर्वी ‘लाडली बहनां’ना राज्य सरकारकडून भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात लाडली बहनांना (लाडक्या बहिणी) 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर उपब्लध होणार आहे. गॅस सिलिंडरच्या दरातील उर्वरित रकमेची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे. अशाप्रकारे अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांना पंतप्रधान जीवनज्योती योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांचे काम आता राज्य सरकारकडून केले जाणार आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये अॅलोपथी रुग्णालयात चिकित्सेचे सर्व पर्याय उपलब्ध करविण्यासाठी आयुष शाखेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article