For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदलगा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

10:58 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदलगा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट
Advertisement

एकाचा मृत्यू, एक जण गंभीर; दोन मुली जखमी : नजीकच्या घराची भिंतही कोसळली 

Advertisement

वार्ताहर/सदलगा

येथील प्रकाशनगर येथे गुरुवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून दोन लहान मुलींना दुखापत झाली आहे. या स्फोटामुळे नजीकच्या घरांना देखील तडे जाताना काही भिंती कोसळल्याचा प्रकार घडला. सदर घटना गुरुवारी पहाटे साडेचार वाजता घडली. सूर्यकांत शेळके (वय 66) असे मृताचे नाव आहे. त्यांचे नातलग ज्ञानदेव शेळके (वय 33) यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. तर गॅस स्फोट झाल्याने भिंत पडून शेजारील दगडू बागडी यांच्या दोन मुली जखमी झाल्या आहेत. प्रियांका दगडू बागडी (वय 17) व दिव्या दगडू बागडी (वय 6) अशी सदर मुलींची नावे आहेत. जखमी झालेल्या मुलींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

सूर्यकांत शेळके व ज्ञानदेव शेळके हे बांधकाम कामगार आहेत. ते महाराष्ट्रातील नांदेड येथील असून सदलगा येथे कमानीचे बांधकाम करण्यासाठी ते येथेच खोली करून राहत होते. रात्री गॅस कनेक्शन बंद केले नसल्याने अथवा गॅस गळती झाल्यामुळे पहाटे उठल्यानंतर गॅस पेटवताना किंवा लाईट लावल्यानंतर गॅसचा स्फोट झाल्याने ही गंभीर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी सदलगा पोलीस स्थानकाचे पीएसआय, चिकोडीचे सीपीआय, डीवायएसपी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच सदर घटनेची आमदार शशिकला जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी यांनीही चौकशी करून माहिती घेतली आहे.

Advertisement
Tags :

.