For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंगचा आयपीओ 8 रोजी खुला होणार

06:39 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंगचा आयपीओ 8 रोजी खुला होणार
Advertisement

गुंतवणूकदारांना 10 ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येणार : किमान गुंतवणूक 14,915

Advertisement

मुंबई :

गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओ 8 ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणूकदार या इश्यूसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जाणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

कंपनी या इश्यूद्वारे 264.10 कोटी उभारणार आहे. यासाठी कंपनी 173.85 कोटी किमतीचे 18,300,000 ताजे समभाग सादर करत आहे. तर, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 90.25 कोटी किमतीचे 9,500,000 शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे विकत आहेत. तुम्हीही यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पाहा किती रक्कम गुंतवावी लागेल ते.

किमान व कमाल रक्कम किती आहे?

गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंगने या इशुची किंमत 92-95 निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 157 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. तुम्ही आयपीओवरच्या प्राइस बँडवर 95 वर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, त्यासाठी 14,915 ची गुंतवणूक करावी लागेल. त्याचवेळी, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजेच 2041 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी गुंतवणूकदारांना अप्पर प्राइस बँडनुसार 193,895 ची गुंतवणूक करावी लागेल.

रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव 35 टक्के हिस्सा

कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी इश्यूचा 50 टक्के राखीव ठेवला आहे. याशिवाय, सुमारे 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि उर्वरित 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

Advertisement
Tags :

.