For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गार्गीचे राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत यश

10:52 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गार्गीचे राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत यश
Advertisement

बेळगाव : मणिपूर येथे झालेल्या एसजीएफआय पदवीपूर्व महाविद्यालयीन राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत बेळगावची गोगटे महाविद्यालयाची खेळाडू गार्गी बिळगीकरने कर्नाटक संघाचे प्रतिनिधीत्व करत स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे. एसजीएफआयने महिलांच्या फुटबॉल स्पर्धेला गेली चार वर्षे मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. अशा मोठ्या स्पर्धेत बेळगाव शहरातील गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी गार्गी बिळगीकरने भाग घेऊन यश संपादन केले आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्या अंजली केरूर, संस्थेचे चेअरमन आर. एस. मुतालिक, संस्थेचे अध्यक्ष ए. के. तगारे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.