गार्डन रीच शिपबिल्डर्स समभागाची उसळी
मुंबई:
सरकारी संरक्षण कंपनी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सचा समभाग बुधवार 14 मे रोजी जबरदस्त उसळी घेताना दिसला. कंपनीचा समभाग 18.25 टक्के उसळत 2264 रुपयांवर पोहचला होता. ही कंपनी भारतीय नौदल आणि भारतीय तट रक्षकच्या युद्धयुक्त जहाजे, व्यावसायिक आणि इतर जहाजांची निर्मिती करते. कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे असून भारतातील समुद्री क्षमतांना बळकटी देण्यात कंपनीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सरकारी कंपनीचे समभाग मार्च तिमाहीतील चांगल्या नफ्यामुळे व लाभांश घोषणेमुळे चांगलेच वधारले आहेत. कंपनीने जानेवारी ते मार्चदरम्यान 244 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला असून तो वर्षाच्या आधारावर 118 टक्के अधिक आहे. वर्षाआधी याच अवधीत कंपनीने 112 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. याचबरोबर सरकारकडून 54 हजार कोटी रुपयांचे कंत्राटही कंपनीला प्राप्त झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला आहे.
3 दिवसात 25 टक्के उसळी
याचदरम्यान गार्डन रीचचा समभाग गेल्या तीन सत्रांमध्ये 25 टक्के इतका वाढला आहे. शुक्रवारी कंपनीचे समभाग 1795 रुपयांवर बंद झाले होते. पण बुधवारी समभाग 2264 रुपयांवर इंट्रा डेदरम्यान कार्यरत होते.